काही वर्षांपूर्वी एक चिनी चित्रपट पहिला होता. त्यातील वयस्क जोडपे घटस्फोट घेते, सगळे बरे चाललेले असूनही. का? तर त्यांना सरकारी कोट्यातून घर हवे असते; आणि घटस्फोटीत महिलांना प्राधान्य देण्याचे सरकारी धोरण असते.
बातमीदार वरचा लेटेस्ट लेख वाचून याची आठवण झाली. (विषय: मुख्यमंत्र्यांनी कलाकारांच्या कोट्यातून घर वाटप करताना काही जणांवर व जणींवर केलेली कथित मेहेरनजर. आणि यासंबंधातील सकाळची एकस्ळूझीव बातमी.) बापू अत्रंगे यांच्या म्हणण्यानुसार मागे एका पत्रकार जोडप्याने घटस्फोट घेऊन दोन सरकारी घरे मिळवली -- शेजारी-शेजारी -- आणि ते परत एकत्र नांदू लागले!
असो.
सकाळच्या बातमीनुसार, सोनाली कुलकर्णी उर्फ नटरंग मधील अप्सरा हिसही या प्रकारात घर मिळाले. यावरून सुचवला गेलेला एक मथळा: "अप्सरेला घर देताना, नियमांचे वाजले की बारा!"
दुर्दैवाने हा मथळा अमान्य झाला.
No comments:
Post a Comment